रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन
वार्षिक सर्वसाधारण सभेची अधिकृत नोटीस
प्रति,
सर्व माननीय सदस्य,
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन.
विषय :
वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याबाबत.
महोदय,
आपणांस कळविण्यात येते की, रायगड जिल्हा
क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांची वार्षिक
सर्वसाधारण सभा मा. अध्यक्ष श्री. अनिरुद्ध
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार,
दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी
५.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सभेचे स्थळ :
लक्ष्मी नारायण हॉल (कडू सर हॉल),
माढा कॉलनी, पेण, महाराष्ट्र – ४०२१०७.
सदर सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करून
आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार आहेत.
तरी सर्व माननीय सदस्यांनी सभेस वेळेवर
उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती.
वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा
-
मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.
-
सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षाचा आर्थिक
ताळेबंद सभेसमोर सादर करणे व मंजुरी घेणे.
-
सन २०२६–२०२७ या आर्थिक वर्षासाठी
लेखापरीक्षकाची (ऑडिटरची) नियुक्ती करणे.
-
सन २०२५–२०२६ मध्ये आयोजित करण्यात
आलेल्या क्रिकेट स्पर्धांचा अहवाल व
माहिती सादर करणे.
-
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या
सुधारित घटनेच्या मसुद्यावर चर्चा करून
मंजुरी देणे.
-
असोसिएशनला प्राप्त झालेल्या
पत्रव्यवहारावर चर्चा करून आवश्यक ते
निर्णय घेणे.
-
असोसिएशनच्या नियमांचे व शिस्तीचे
उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध
आवश्यक ती कारवाई करण्याबाबत चर्चा
करून निर्णय घेणे.
-
मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी
उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा करून
निर्णय घेणे.
कोरमबाबत सूचना
सभेच्या निर्धारित वेळेस आवश्यक तेवढा
कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब करण्यात
येईल. त्यानंतर अर्ध्या तासाने त्याच
ठिकाणी सभा पुन्हा सुरू करण्यात येईल.
अशा प्रकारे पुन्हा सुरू झालेल्या सभेस
कोरमची आवश्यकता राहणार नाही.
तरी सर्व माननीय सदस्यांनी सदर नोटीसची
नोंद घेऊन सभेस वेळेवर उपस्थित राहावे व
सभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवावा,
ही विनंती.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
प्रदीप नाईक
सरचिटणीस
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन
नोटीस दिनांक : १५ ऑक्टोबर २०२६